गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूल येथे बसवाहकाने कोवळ्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केल्यानंतर सर्वत्र शालेय मुलामुलींची सुरक्षितता यावर जोरदार चर्चा सुरू आहेे. खरं पाहिलं तर शाहदरा येथील खासगी शाळेत जेव्हा पाचवर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला तेव्हाही असाच चर्चेचा धुराळा उडाला होता व लगेच बसलाही होता. आपल्या इथे चर्चा खूप होते. विद्वान माणसं खूप मुद्देही मांडतात, पण पुढे काही एक होत नाही. त्यात तर तो विषय शिक्षणासंबंधी असेल तर प्रत्येक जण आपला तो विषय नव्हे, म्हणत बाजूला सरतो व प्रश्न तसेच राहतात. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर व महिला – बालकल्याण मंत्री मनेका गांधी एक उच्चस्तरीय बैठक घेत त्यात शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा नियमावलीबाबत चर्चा करत काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवणार आहेत. पण पुन्हा प्रश्न तोच ते सर्व पाळणार कोण? व जे पाळणार नाहीत त्यांना शिक्षा कोणती? शाळांमध्ये मदतनीस म्हणून महिलांची नेमणूक करावी, विशेष करून शाळाच्या बसमधील वाहक या महिलाच असाव्यात असं मनेकाबाई म्हणते आहे. पण खरा प्रश्न आहे तो मुलांच्या घरापासून शाळेत ते घरी परत येईपर्यंतच्या प्रवासाचा जो प्रवास रिक्षा, व्हॅन, स्कूल बसेस ( व मुंबईत बेस्टसह लोकलगाड्या) द्वारा होता व त्या त्या वाहनांचे जे चालक आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्याचा व्यसनांचा प्रश्न जोपर्यंत हा प्रश्न पालक गंभीरपणे सोडवत नाही, तोपर्यंत तो प्रश्न प्रश्नच राहणार आहे. मुलांना शिस्त लावणं व त्यानुसार दररोज वागायला भाग पाडणारी व्हायला हवं. रिक्षा, व्हॅनमध्ये गडबड, मारामारी खोड्या न करता बसणं व येणं हेही सांगायला हवं. स्वत:च्या शरीराची पूर्णत: ओळख करून देत हात न मिळवणं. स्पर्श न करणं, जवळीक न साधणं या गोष्टी निक्षून सांगायला हव्यात.
आपलं अध्यापनाचं कार्य व्यवस्थित व मुलांपर्यंत पोहोचणारं करतील तेव्हा खूपसं प्रश्न सुटतील, चंचल, वात्रट विद्यार्थ्याचेही प्रमाण कमी होत शिस्त राखली जाईल. मुलांना ऊठसुट शारीरिक, मानसिक शिक्षा करणारी पूर्णत: थांबली पाहिजे. जी गोष्ट शाळांच्या ध्यानी येत नाहीये. मुख्याध्यापकांनी केबिन सोडत सतत राऊंड मारणे, ज्यांना ज्या ज्या कामासाठी नेमलेय त्यांना ते ते काम वेळेवर, व्यवस्थित करण्याबाबत सांगणे वा उभे राहून करून घेणे व्हायलाच हवे. शाळा सुरू होण्याअगोदर अर्धा-एक तास लवकर येणं व नंतरही थांबणं हे सर्वांना आवश्यक (सक्तीच केलं पाहिजे. शाळेच्या वेळात एकही वर्ग शिक्षक नाही म्हणून मोकळा ठेवता कामा नये. बाथरुमला जाणं, येणं याचंही नियोजन असावं तिथे सेविका, सेवक पूर्णपणे हजर असणे बंधनकारक असावं. पालक शिक्षक संघाला हाताशी घेत, सर्व नियम समाजावून सांगत. त्यांचेही उत्तम सहकार्य मिळवायलाच हवे अन् त्या त्या संघाने, समितीने प्रत्येक क्षेत्रात लक्ष घालत मुलांची सुरक्षितता जपली पाहिजे. आज सर्वत्र महिला पालक जागरूक दिसताय पण त्यांच्या बरोबरीने जेव्हा पुरुष पालक आपल्या 100 टक्के सहभाग नोंदवतील आणि जातीने शाळेय कामकाजात लक्ष घालतील तेव्हाच हे सारे प्रश्न सुटतील. सीसीटीव्ही कॅमेरे वा इतर कितीही पॉवरफुल यंत्रणा उभी केली तरी त्याचा काही एक उपयोग नाहीये व तिच गोष्ट रायन इंटरनॅशनल स्कूल प्रकरणाने पुन्हा एकदा तीव्रतेने समोर आली आहे.
-चंद्रकांत भंडारी,जळगाव
9890476538