हैदराबाद । योग्य गणवेश घातला नाही म्हणून एका 11 वर्षांच्या मुलीला शिक्षा म्हणून मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा करण्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला. हैदराबादमधल्या रामचंद्रपूरम इथल्या राव महाविद्यालयात ही मुलगी पाचवीत शिकत आहे. ही मुलगी शाळेमध्ये घरातले कपडे घालून गेली होती. पीटी शिक्षक तिच्यावर भडकले आणि तिला त्यांनी मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा केली. तसंच आता पुन्हा असं होता कामा नये आणि शाळेच्या गणवेशातच यायला हवे असेही या शिक्षकानं तिला बजावले.