शालेय विद्यार्थी हत्याप्रकरणी जाहीर निषेध

0

नंदुरबार । डि.आर.हायस्कुल येथील इयत्ता नववीत शिकणारा निष्पाप शालेय विद्यार्थी राज ठाकरे याची निर्घुण, निर्दयी हत्या निव्वळ चैनीसाठी, व्यसनाकरीता शालेय विद्यार्थ्यांकडून घडली, असे तपासाअंती पोलीस प्रशासनाच्या प्रेसनोट, वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.हत्या करणारा शालेय विद्यार्थी बालगुन्हेगारीत मोडत आहे. ही बाब सर्व समाजाला विचार करायला लावणारी आहे.बाल गुन्हेगारी कोणत्याही समाजात, कोणत्याही बालकामध्ये अथवा कोणत्याही व्यक्तीमध्ये अशा विकृत प्रवृत्तीची वृत्तीचा शिरकाव होवू नये. याची जबाबदारी घेण्यासाठी मुकमोर्चाच्या माध्यमाने आपल्या संवेदनशिल भावना व्यक्त करण्यासाठी सर्व सुजाण नागरीकासह सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वारसा जपणार्‍या जनसमुदायास या जाहीर निषेध पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

न्याय मिळवून देण्यासाठी..
नंदुरबार जिल्ह्यातील असुरक्षितता, घबराट सर्व समाजात पसरली काळी छाया दूर करण्यासाठी शासन, प्रशासनास निवेदन करणे आवश्यक वाटल्याने दि.20 गुरुवार रोजी सकाळी 11.30 वाजता मुकमोर्चा आयोजित केलेला आहे. या मुकमोर्चात आपण सर्वांनी सहपरिवार, विद्यार्थी, पालक, सुजाण, विचारवंत, बुद्धीजिवी नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी महासंघासह संलग्न सर्व सामाजिक वारसा जपणार्‍या जनसंघटना यांच्याकडून करण्यात आले आहे. मुकमोर्चाचा मार्ग असा राहिल. महाराणा पुतळा चौक येथून सुरुवात नेहरु पुतळा, हाट दरवाजा , महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नवापूर चौफुली , जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोचार्र्चा समारोप होईल.