चाळीसगाव । तालुक्यातील तळेगांव- कृष्णानगर येथील जिल्हा परिषद शाळेत सरपंच सोनाली देशमुख यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना स्वेटरचे वितरण करण्यात आले. चौदाव्या वित्त आयोगाच्या तळेगाव आणि कृष्णानगर जिल्हा परिषद शाळा तर आंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून गावातील नवजात शिशुंसाठी उबदार स्वेटरचे वितरण करण्यात आले.
आचारसंहितेमुळे स्वेटर वाटपास विलंब
ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहीता लागल्याने स्वेटर वितरण करण्यास विलंब झालेला होता. आचारसंहीता शिथील होताच सरपंच सोनाली देशमुख यांनी याबाबत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी अधिक्षक, आशा स्वयंसेविका यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मंदा लिंडायत, उज्ज्वला जाधव, किसन वाघ, केंद्रप्रमुख विनायक ठाकूर, शिक्षक संभाजी पाटील, देविदास मोरे, जगदीश पाटील तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि पालक उपस्थित होते.