मुंबई । आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, स्पोर्ट्स असोसिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेन आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे कबड्डी दिनानिमित्त 15 जुलै रोजी दुपारी 4.00 वा. ालेय खेळाडूंसाठी कबड्डी खेळाच्या प्रचलित नियमांवर आधारित प्रश्नोत्तरे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कबड्डी खेळाच्या नियमांवर नुकत्याच झालेल्या शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डीप्रसंगी सखोल माहिती देण्यात आली होती.
पुन्हा एकदा उजळणी वर्ग घेऊन कबड्डी नियमांबाबत गाळलेले शब्द भरणारी प्रश्न पत्रिका दिली जाणार आहे. अचूक उत्तरे लिहिणार्या पहिल्या दहा विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाईल. कबड्डी नियमांची प्रश्नोत्तरे स्पर्धा फक्त शालेय मुलामुलींसाठी असून मोफत प्रवेशाची आहे. हा उपक्रम आरएमएमएस सभागृह, जी.डी. आंबेकर मार्ग, परेल, मुंबई-
12 येथे होईल.
प्रथम येणार्या 25 शाळांच्या पत्रधारकाना खेळाच्या नियमांची विनाशुल्क मार्गदर्शिका दिली जाईल. तसेच वैयक्तिकरित्या सहभागी नांवे नोंदणीसाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सेक्रेटरी शेखर चव्हाण किंवा अजित आचरेकर, शॉप क्र.19, शिवशक्ती सी, पिंगळे मार्ग, चिंचपोकळी-पूर्व, मुंबई-12 (मो.9224679523) येथे संपर्क साधावा.