शालेय व्यवस्थापन समित्यांना दोन दिवसीय प्रशिक्षण

0

बभळाज । येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय व्यवस्थापन समित्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बभळाज व्यवस्थापक समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील व उपाध्यक्ष मणिराम जाधव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुवर्णा पाटील होत्या. यावेळी केंद्रप्रमुख यो.रा.लोहार, अ‍ॅड.संतोष पाटील, आबासाहेब भिसे, मुख्याध्यापक किशोर गाडीलोहार आदी उपस्थिती होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सन 2015 आदर्श शाळांची निवड करुन त्या शाळांवर परिसरातील केंद्रांतर्गत शाळांच्या व्यवस्थापन समिती सदस्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार जि.प. शाळा आयएसओ 9001 मानांकन प्राप्त असल्याने या शाळेची प्रशिक्षणस्थळ म्हणून निवड करण्यात आली.

15 शाळांचा समावेश
समितीच्या कार्यकाळात शाळेचा कायापालट झाला त्या पदाधिकार्‍यांनी सहभागी समित्यांच्या सदस्यांना अनुभव सांगून मार्गदर्शन करावे अशी या प्रशिक्षणाची संकल्पना आहे. शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती या विषयांवर तर मणिराम जाधव यांनी समितीची रचना व कार्ये आणि शिक्षकांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन केले. केंद्रातील तोंदे, हिसाळे, तरडी, बभळाज, अंजनाडगाव, अजनाडबंगला, सावरे, भाटपुरा, महादेव दोंडवाडे, सरीपाणी, काईडोकीपाडा, सोडाबर्डीपाडा अशश एकूण 15 शाळांनी सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील, गोपाल चाचरे, किला पाटील, आशा ठाकरे, प्रिया पाटील या शिक्षकांनी परिश्रम घेतले.