शालेय शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवणे हे शिक्षकांचे कर्तव्य

0

निंभोरा। देशाच्या तरुणाईचे भविष्य घडविण्याची क्षमता शिक्षकांकडे आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता टिकविणे हि आद्य कर्तव्य समजावे असे प्रतिपादन बी.आर. पाटील यांनी केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिपक पाटील यांच्या वतीने मौजे वाघाडी येथे इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निंभोरा, खिर्डी बु., खिर्डी खु., वाघाडी, रेंभोटा, शिंगाडी, धमोडी येथील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करावे
माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी भविष्य उज्वल करण्यासाठी अनावश्यक गोष्टीकडे लक्ष न देता गुणवत्तेसाठी प्रयत्न करावे व शिस्तीचे पालन करावे असे सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, युवक उपाध्यक्ष सागर चौधरी, नामदेव बलिराम महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी प्रकाश पाटील, सिताराम महाजन, उमाकांत महाजन, रामदास कोळी, हरलाल पाटील, मिलींद चौधरी, जगदीश पाटील, बाळू तायडे, युवक पंचायत समिती गण प्रमुख चावदस पाटील, हर्षल पाटील, लीलाधर महाजन, विशाल पाटील, धोंडू कोळी, शिवाजी पाटील, योगेश महाजन, गणेश महाजन, शांताराम कोळी, तुषार पाटील, तुषार महाजन, तुषार कापसे, प्रमोद महाजन, घनशाम पाटील, गणेश महाराज, विलास पाटील, गोकुळ पाटील, रोशन पाटील, शुभम पाटील, किरण कोळी, कांतिलाल गाढे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर प्रास्ताविक दिपक पाटील यांनी केले.