शालेय साहित्याचे वाटप

0

खेड। ठाकरवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याबरोबरच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लायन्स क्लब ऑफ सफायरचे अध्यक्ष संजय वाडेकर यांनी सांगितले. कमान येथील ठाकरवस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्यावतीने शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष संजय वाडेकर, संजय सोनी, संजय बोंडे, अविनाश कर्पे, विजय सारडा, संतोष सोनवळे, बाजीराव कवारी, संदीप नाईकरे, चंद्रकांत नाईकरे, मुख्याध्यापक सुरेश नाईकरे आदी उपस्थित होते. आभार सहशिक्षक अमोल सांडभोर यांनी मानले.