जुन्नर । हभप सर्जेराव गाढवे, उद्योजक गिरीष डांग व पुणेकर मित्रमंडळ यांच्यावतीने मुथाळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 1 ली ते सातवीच्या 90 विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गाढवे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता एकंदरीत शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्यासमवेत आलेल्या पुणेकर मित्रमंडळींनी शालेय परिसरातील कुपनलिकेत विद्युतपंप बसविण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक गिरीश डांग, सचिन मंडलिक, स्नेहल लुणावत, योगेश कुलकर्णी, राजेश शेट्ये, मंगेश देसाई, आनंद जाधव, संदीप प्रधान, बाबुराव काळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पोकळे, ठमाती कवटे, युवराज डामसे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र डुंबरे यांनी केले. सूत्रसंचालन वनिता जाधव व विजय नांगरे यांनी केले. तर मंगेश देवगिरे यांनी आभार मानले. ओतूर येथील दंतवैद्यक डॉ. सविता फलके यांच्यावतीने टुथपेस्ट व ब्रश किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली डुंबरे यांचे सहकार्य लाभले.