पिंपरी-सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोहिंडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा रौंधळवाडी व गणेशखिंड शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील 65 विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्याचे वाटप केले. सर्व शाळेमध्ये आदिवासी ठाकर, दलित व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या कार्यक्रमासाठी प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन संस्थेचे स्वप्नील डाळिंबकर, अमोल कुदळे, अमोल मोडक, प्रफुल्ल इंगोले, विशाल कुदळे, प्रमोद यादव, राजेश गवळी, आनंद घाटविलकर, प्रतीक भोसले, योगेश प्रसाद आदी उपस्थित होते. संस्थेने यापूर्वी धुळे येथील जिल्हा परिषद शाळा कापडणे येथे 80 विद्यार्थ्यांना व फुलगाव येथे ईश्वरपूरम या वसतिगृहामधील 25 मुलांना शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप केले होते.