जळगाव । जिल्ह्यातील पोषण आहार प्रकरण विधानसभेच्या मागील हिवाळी अधिवशेनात पोषण आहाराच्या अनागोंदीचा मुद्दाही गाजला होता. जिल्हा परिषद व अनुदानित शाळा, विद्यालयांमध्ये शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहार पुरविला जातो. मागील ठेकेदारांकडील ठेका रद्द झाला आहे. मागील ठेकेदाराला मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. पोषण आहार पुरवठ्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार असून नवीन ठेकेदारांमार्फत पुरवठा सुरु होईल तोपर्यत मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावर पोषण आहार खरेदी करण्याच्या सुचना शिक्षण संचालक यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिल्या आहेत. नवीन निविदा प्रक्रियेला उशीर होणार असून जिल्ह्यात पोषण आहाराचा केवळ महिन्याभराचा साठा शिल्लक आहे. पोषण आहारामध्ये 155 रुपये किलोने तूरडाळ घ्यावी ते बंद करुन 60 ते 70 किलो दराने मिळणारी तूरडाळीचा पोषण आहारात समावेश करावा.