शाळकरी मुलास गायब करण्याचा प्रयत्न

0

सोयगाव। तालुक्यातील गलवाडा येथील अशोक सुदाम सोनवणे यांचा नववीत शिक्षण घेणार्‍या 15 वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी बळजबरीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. अशोक सोनवणे यांनी याबाबत सोयगाव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी 26 रोजी होमगाडं व पोलीस मित्र योगेश बोखारे यांच्या मदतीने सोयगांव बीट जमादार त्रिकोचंद पवार यांना संबंधीत प्रकाराविषयी माहिती दिली. अजिंठा बस स्थानक परिसरातून या मुलास ताब्यात घेण्यात आले असून पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सहा.पोलिस निरिशक सुजित बंडे यांनी दिली.