भुसावळ । भुसावळ येथे साकेगावहून शिक्षणासाठी येणार्या 14 वर्षीय विद्यार्थिनीस बसमध्ये चढू देण्यास मज्जाव करीत तिला मारहाण करणार्या रावेर आगारातील वाहकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
9 रोजी शाळकरी विद्यार्थिनी रावेर-जळगाव बस (क्र.0721) मध्ये चढत असताना या बसमधील वाहक ईश्वर पुंडलिक महाजन यांनी विद्यार्थिनीच्या कानशीलात वाजवत बसमध्ये चढू न दिल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीचे पालक अशपाक शे.अशरफ अमीर बागवान यांनी तक्रार दिल्यावरून वाहक महाजन यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या वाहकावर पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली.