शाळकरी विद्यार्थ्यास लुटले : त्रिकूटाविरोधात गुन्हा

A Trio Beat And Robbed A Student At Shambhuraje Chowk In Bhusawal भुसावळ : शाळकरी विद्यार्थ्यास अडवून त्यास मारहाण करीत त्याच्याकडील सातशे रुपये बळजबरीने हिसकावण्यात आल्याची घटना धक्कादायक घटना शहरातील शंभूराजे चौकात गुरुवार, 13 रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. या प्रकरणी त्रिकूटाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोळी मारण्याची धमकी देत पलायन
शहरातील मोहम्मद अयान शेख जहीर (15, आशा हाईटस, खडका रोड, भुसावळ) या विद्यार्थ्याने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवार, 13 रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता ट्यूशनसाठी निघाल्यानंतर शहरातील शंभूराजे चौकात आल्यानंतर संशयीत आरोपींनी रस्ता अडवत शिविगाळ करून मारहाण केली तसेच ट्यूशन फि देण्यासाठी असलेले सातशे रुपये खिशातून बळजबरीने काढून घेतले तसेच तुझ्या वडिलांना आम्हाला दोन लाख रुपये देण्यासाठी सांग, अन्यथा गोळी मारू, असा हिंदीत संवाद साधून पळ काढला.

या संशयीतांविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी विद्यार्थ्याने आपबिती कुटुंबियांना सांगितली व नंतर बाजारपेठ पोलिसात गुरुवारी रात्री विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी कृष्णा उर्फ शुटर मिलिंद गायकवाड (गंगाराम प्लॉट, भुसावळ), संदीप बुधा खंडारे (दिनयाल नगर, भुसावळ) व दुर्गेश (पूर्ण नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.