वाल्हे । ग्रामीण भागाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पुण्यातील जयसाहेब भगवानराव गिडवाणी परिरवारातर्फे वाल्हे परिसरात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक शाळांना वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले. वाल्हे येथील समाजहीत जोपासणारी संस्था ग्रामविकासाच्या माध्यमातून फिल्टर वाटप करीत आहे. हा कार्यक्रम येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपात झाला. वाल्हे केंद्रातील मुकदमवाडी, गायकवाडी, अंबाजीचौवाडी, सुकलवाडी, मदनेवस्ती, कामठवाडी, मोरूजीचीवाडी, आडाचीवाडी, वरामळा, तसेच दौंडज, तरसदरा, पिंगोरी, कवडेवाडी व पिसुर्टी भागातील जिल्हा परिषदेच्या जवळपास 21 प्राथमिक शाळांना 24 वॉटर फिल्टरचे वाटप लेखिका लक्ष्मी भगवानराव गिडवाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
पटकथाकार आबासाहेब गायकवाड, मधू तुलसाणी, नंदकुमार सागर, चरेखा अजवाणी, शालिनी पवार, सरपंच कल्पना गोळे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी.डी.गायकवाड, सत्यवान सूर्यवंशी यांसह ग्रामविकास संस्थेचे भुजबळ, अतिश जगताप, नाना दाते, अॅड.किरण कुमठेकर, दादा म्हेत्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते. प्राथमिक शाळेच्या केंद्रप्रमुख उज्ज्वला नाझरेकर यांनी आभार मानले.