शाळासिद्धीतील नियोजनातून होतील शालेय सुधारणा

0

कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. पाटील व प्रा. आठवले यांनी साधला प्राध्यापकांची संवाद

भुसावळ- प्रत्येक शाळेला आपल्या क्षमतेने सर्वोत्कृष्ट परीणाम मिळवण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी शाळासिद्धीमधील नियोजन व प्रतिसाद महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यासाठी शाळासिद्धीतील स्वयंमूल्यमापनात केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी केल्यास शालेय सुधारणा गतीने होणार असल्याचे प्रतिपादन शाळासिद्धीचे राज्य निर्धारक तथा सुलभक डॉ. जगदीश पाटील व प्रा. प्रमोद आठवले यांनी केले.

जामनेरला शाळा सिद्धी कार्यशाळा
जामनेर येथील गिताबाई दत्तात्रय महाजन कला, श्री केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य आणि मनोहरशेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी शाळासिद्धी कार्यशाळा घेण्यात आली. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.किरण कुलकर्णी व प्रा.मंदा पाटील उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील व प्रा. प्रमोद आठवले यांनी तीन तासांच्या कार्यशाळेत शाळासिद्धी संकल्पना ते शाळा सुधारणा अशी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, शाळासिद्धी या राष्ट्रीय मूल्यांकनात स्वयंमूल्यमापन व बाह्यमूल्यमापन अशा दोन घटकांचा समावेश आहे. स्वयंमूल्यमापनावरच आधारित बाह्यमूल्यमापन आहे, त्यामुळे स्वयंमूल्यमापनात निवडलेला स्तर आणि त्या स्तरानुसार शाळा विकासाच्या नियोजनाने शाळा सुधारणा होऊ शकणार आहे.

पुरावे सादर करावे लागणार
स्वयंमूल्यमापनात नोंदविलेल्या बाबी बाह्यमूल्यमापनाच्या वेळी शाळासिद्धी राज्य निर्धारक पडताळून पाहणार आहेत. हे पडताळून पाहत असताना पुरावे सादर करण्याची गरज भासेल. अशावेळी पहिली ते बारावी वर्ग असलेल्या शाळांनी संकेतक पुरावे, समर्थक पुरावे व शाळेस तयार करावे लागणारे पुरावे अशा पुराव्यांचे संकलन करावे. पुराव्यांचे वर्गीकरण करून मांडणी करावी आणि शाळासिद्धी राज्य निर्धारक बाह्यमूल्यमापनासाठी आल्यानंतर त्यांच्यासमोर हे पुरावे सादर करावे.

यांनी घेतले परीश्रम
सूत्रसंचालन प्रा.अंजना महाजन तर आभार प्रा.मनीषा चावरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.किरण कुलकर्णी, प्रा.मंदा पाटील, प्रा.अंजना महाजन, प्रा.हंसराज भदाणे, प्रा.पद्माकर महाजन, प्रा.प्रकाश सपकाळ, प्रा.मनीषा चावरे, प्रा.रेखा बागडे, प्रा.मिलिंद सुरवाडे, प्रा.मंगेश पाटील, प्रा.ज्योती दोड आदींनी परीश्रम घेतले.