शाळा कधी सुरु होणार?; जाणून घ्या एका क्लिकवर

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाच महिने उलटूनही अद्याप शाळा कधी सुरु होणार याबाबत काहीही स्पष्ट नाही. शाळा सुरु होण्यास होणारा विलंब पाहता ऑनलाईन शिक्षण देखील देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या मार्गदशर्क सूचना प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी शाळा सुरु करण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

२३ मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. तेव्हापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. ३१ ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे. यावेळी राज्यांना शाळा सुरु करण्यासंबंधी सांगितले जाण्याची शक्यता आहे.