नवी दिल्ली – देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशभराती सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत, अशी माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच शाळा, कॉलेज बंद आहेत. दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने सर्व पालकांना शाळा पुन्हा कधी सुरु होणार हा प्रश्न सतावत आहे. दरम्यान १५ जून पासून शाळा सुरु होणार असल्याचे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानंतर गोेंधळात भर पडली होती.