शिंदखेडा। सर्व 1109 जि.प.प्राथमिक शाळा डिजिटल झाल्यामुळे धुळे जिल्हयाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. या कामात विशेष परीश्रम घेणार्या अधिकारी ,केद्रप्रमुख, प.स.सदस्य,शिक्षक, ग्रामसेवक,व संस्थांचा सन्मान राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण हे उच्च शिक्षणाचा पाया मानला जाते.संस्कारक्षम पिढी निर्माण होणे साठी प्राथमिक शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी शासनाने आधुनिक तंत्रज्ञान जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. प्रत्येक शाळेला प्रोजेक्टर व आवश्यक ते सर्व साहित्य घेण्यास निधी देण्यात आला. शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
1109 जि.प.प्राथमिक शाळा डिजीटल
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील सर्व घटकांनी आपल्या गावातील शाळेत प्रभावीपणे हि योजना राबविली परिणामत. धुळे जिल्हयातील सर्व 1109 जि.प.प्राथमिक शाळा डिजीटल झाल्या आहेत. धुळे जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. डिजिटल शाळा या उपक्रमामूळे विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयीची आवड वाढली असून गळतीचे प्रमाण देखील कमी झाले आहे.जिल्हा शिक्षण विभागावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. या उपक्रमात प्रभावी योगदान देणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते 2 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राजभवनात करण्यात येणार आहे. तसे पत्र शिंदखेडा येथील गटशिक्षणाधिकारी मनिष पवार यांना प्राप्त झाले आहे
यांचा होणार आहे सन्मान
मुख्य कार्यकारी अधिकारी – ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी(प्राथमिक)-मोहन देसले, शिंदखेडा तालुका गटशिक्षणाधिकारी मनिष पवार, शिक्षण विस्तार अधिकारी-भारती भामरे(सोनगीर), विठ्ठल घुगे(बोरकुंड), देवगीर बुवा (चिरणे), केंद्रप्रमुख-वासुदेव सोनवणे(रोहड), विठ्ठल धनगर(कुडाशी), जितेंद्र झाल्टे (बोरकुंड), छाया खैरनार(मेहेरगांव), अविनाश पवार(वेल्हाणे), प्रकाश पवार(सांगवी), नानासाहेब बोरले(कलमाडी), अरविंद पाटिल(नरडाणा), ग्रामसेवक-भाऊसाहेब गवळे(कुडाशी), पं.स.सदस्य-उत्पल नांद्रे(साक्री), जि.प.शिक्षक-किशोर पाटिल (धाणेगांव),कैलास बहिरम(डवणेपाडा), देशबंधू व मंजूगुप्ता फाऊंडेशनचे प्रतिनिधी-रावसाहेब बढे.