शाळा दुरूस्तीसाठी माजी विद्यार्थ्यांना आवाहन

0

डॉ विनोद कोतकर यांची संकल्पना; अनेकांचा मदतीचा हात
चाळीसगाव – 1909 साली स्थापन झालेल्या व 116 वर्ष जुनी असलेली चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची जुनी शाळा इमारत दुरूस्तीचे काम सध्या महिनाभरापासून सुरू असुन शाळेत शिकून गेलेल्या जवळपास दिडशेच्या वर सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यानी शाळा दुरूस्तीच्या कामाला मदतीचा हात दिला असून जिर्ण शाळा खोल्यांचे डागडुजी चे काम सुरू झाले आहे, उर्वरित कामासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुढे याव, असे आवाहन चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ विनोद कोतकर यांनी केले आहे. शाळेला आधुनिक शाळा बनिवण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात
ज्या शाळेने आपल्याला घडविले आहे अशी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी ची शहरातील 116 वर्ष जुनी असलेली आंनदीबाई बंकट मुली व मुलांची शाळा ईमारतीचे बराचसा भाग व काही खोल्या जिर्ण झाल्या आहेत. त्यावर असलेले कवले देखील पडची झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होऊन काही विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन शाळेत येत आहे. पर्यायाने अनुचित प्रकार घडु नये म्हणून काही वेळा पावसाळ्यात वर्ग देखील बंद ठेवावे लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागणार असल्याने तसा निधी कुठून उपलब्ध करावा, असा मोठा प्रश्‍न संस्था चालक व सचिवांपुढे होता मात्र यावर संस्थेचे विद्यमान सचिव डॉ विनोद कोतकर यांनी उत्तम प्रर्याय शोधून काढत शाळा दुरूस्तीसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुढे यावे, अशी सुंदर संकल्पना सोशल मीडियाच्या आधारे मांडली. या संकल्पनेला माजी विद्यार्थ्यांनी प्रंचड प्रतिसाद दिला असून सुरुवातीलाच जवळपास दिडशेच्या वर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यात शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, व्यापारी, राजकीय क्षैत्रासह इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या डागडुजीसाठीजी मदत लागेल ती देण्यास पुढाकार घेतला व गेल्या महिनाभरापासुन कामास सुरुवात देखील झाली आहे. सचिव डॉ विनोद कोतकर यांनी सर्व दात्याचे धन्यवाद मानले तर शाळेला अजुन कामाची गरज असल्याने त्यात माजी विद्यार्थ्यांनी एखाद वर्ग दत्तक घ्यावा शाळा खोल्यांचे आधुनिकीकरण करु स्मार्ट क्लास रुम व शाळा ईलर्निग करून द्यावी शाळेत जवळपास 1800 मुले व 1600 मुली असे 3400 विद्यार्थी शिकतात या मुलांना पिण्यासाठी शुध्दपाणी मिळावे म्हणून फिल्टर मशीन ( आर. ओ )बसवुन द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे