जळगाव । जिल्हातील उन्हाळी सुटीनंतर शाळा प्रवेश गुरुवारी 15 रोजी झाला. जिल्ह्याभरातील शाळांमध्ये शाळा प्रवेशानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांना यावेळी पुस्तकाचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले. शासन स्तरावर राबविल्या जाणार्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी रॅलीतुन जनजागृती केली. स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, वृक्ष लागवड संबंधी जनजागृती विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे केली. तसेच आपल्या मित्रांना शाळेत येण्याचे आवाहन केले.
झुरखेडा येथे सीईंओंच्या उपस्थितीत शाळा प्रवेश
जळगाव। जिल्ह्यातील सर्व शाळा गुरुवारी 15 रोजी सुरु झाल्या. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेश सोहळा पार पडला. धरगाव तालुक्यातील झुरखेडा येथे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकाचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले. शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. लोकसहभागातुन शाळा विकास करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी अशोक गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षकवृद उपस्थित होते.
स.न.झंवरतर्फे रॅली
पाळधी। धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी स.न.झवर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातुन रॅली काढली. स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचोआ-बेटी पढाओ आदी अभियानाची जनजागृतीसह विद्यार्थ्यांनी शैक्षणिक घोषणा दिल्या. यावेळी शाळा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपसरपंच रेखा सोमानी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांचे शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे चेअरमन सुनिल झवर, मुख्याध्यापक डी.एम.मोतीराय, एम.व्ही.तोतला यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
खडकी बु. उर्दू शाळेत पुस्तक वाटप
चाळीसगाव। तालुक्यातील खडकी बु. जिल्हा परिषद उर्दू शाळेत गुरुवारी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत पुस्तकाचे वाटप करण्यात आले. 1 लीत प्रवेश घेण्यार्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. खडकी उपसरपंच मुस्ताक खाटीक, माजी उपसरपंच मुराद पटेल, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा अमीना फिरोज पटेल यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शगुफ्ता बाजी यांनी केले तर आभार उपशिक्षक शेख उस्मान पिंजारी यांनी आभार मानले.
ब्राह्मणशेवगे येथे विद्यार्थ्याचे स्वागत
चाळीसगाव। तालुक्यतील ब्राम्हणशेवगे येथील जिल्हा परिषदेची गुरुवारी 15 रोजी झाली. शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गावातुन विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढुन घरी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले. शासनाकडुन प्राप्त झालेली पुस्तके, ग्रामपंचायतकडून दप्तर, अँड.शिवाजी बाविस्कर यांच्यातर्फे वह्या तसेच शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर राठोड, ग्रामसेवक शाम पाटील, आशा माळी, सोमनाथ माळी, पोलीस पाटील राजेंद्र माळी, अँड.शिवाजी बाविस्कर, नागो राठोड, दिलीप पाटील, संजय बाविस्कर, शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे, आर.एल.देसले, नगराज पाटील, सुभाष उगले, सतिष पाटील, विजय मोरे, सुनिल अहिरे, भटु आढावे व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोंढवे येथे जनजागृती
अमळनेर। तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालयात गुरुवारी शाळा प्रवेश झाला. विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सोनूताई पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहारात प्रथम दिवशी मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना गोड शिरा वाटप करण्यात आला. मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, विकासो चेअरमन श्रीराम पाटील, राजू पवार, कैलास पाटील, विजय पाटील, कैलास खैरनार, रावसाहेब पाटील तसेच शिक्षक, डी.आर.पाटील, महेश पाटील, व्ही.डी.पाटील, अमोल पाटील, मनोहर पाटील, पी.पी पाटील, डी.आर.वाघ ,दिलीप पाटील, भगवान पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गालापूर येथे घोड्यावरुन मिरवणूक
एरंडोल। तालुक्यातील जिल्हापरिषद व खाजगी शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आला. शहरातील रा.ति.काबरे विद्यालय, रा.हि.जाजू विद्यालय,जिजामाता विद्यालय, माध्यमिक विद्यामंदिर, बालशिवाजी प्राथमिक विद्यालय, अंग्लो उर्दू हायस्कूलसह ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक व स्थानिक पदाधिकार्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. गालापूर येथील भिल्ल वस्ती शाळेचा पहिला दिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीतील विद्यार्थ्यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांच्या संकल्पनेतून ही मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विवेक पाटील, गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील, सुभाष भिल, आरिफ शे., शरीफ शे., सखाराम सोनवणे, सुरेश भिल, नंदलाल पाटील, मुख्तार शे., जयश्री पाटील, यांचेसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
झेडपी सदस्यांच्या हस्ते शाळा प्रवेश
पाचोरा। तालुक्यातील दुसखेडा, नांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुरुवारी शाळा प्रवेश झाला. जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांच्या उपस्थित प्रवेश सोहळा झाला. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य बंन्शीलाल पाटील सरपंच हेमलता पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश गंवादे, मुख्याध्यापक शैलेंद्र पाटील,विनोद बाविस्कर, संतोष ब्राम्हणे, राजेंद्र पाटील, प्रा.यशवंत पवार, बंडू सुर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरस्वस्ती विद्या मंदिर
अमळनेर। शाळा शुभारंभाच्या पहिल्या दिवशीच प्रवेशोत्सव कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन आनंदी वातावरणात स्वागत करून गोड पदार्थ शालेय पोषण आहारांतर्गत देण्यात आला. यावेळी शिक्षकांनी स्वःखर्चाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी उपशिक्षक आनंदा पाटील, धर्मा धनगर, संगीता पाटील, ऋषिकेश महाळपुरकर, गीतांजली पाटील, परशुराम गांगुर्डे आदिनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले
भडगाव। उन्हाळी सुटीनंतर गुरुवारी 15 रोजी शाळा सुरु झाली. गुरुवार हा शाळेचा पहिलाच दिवस होता. शाळा प्रवेश विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आले. भडगाव तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी गावातुन मिरवणूक काढुन जनजागृती केली. संस्था चालक लोकप्रतिनिधींकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुस्तके वाटप करण्यात आले. वडजी येथील टी.आर. पाटील विद्यालयात शोळेच्या पहिल्याच विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील होते. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थी शिक्षक यांनी प्रभातफेरी काढली. शाळा सुरू झाली, चला शिकूया, शाळेत जाऊया असे फलकाद्वारे विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्याचे सुचित करण्यात आले. पहिल्या दिवशी मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. व्यवस्थापन समिती सदस्य एकनाथ गायकवाड यांनी स्वःखर्चातुन मुलांना वह्यांचे वाटप केले. प्रताप पाटील यांना शिक्षण तपस्वी पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थीना गणवेश, वहया, पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, भिकन पाटील, दिलीप पाटील, मुख्याध्यापक एस.जे . सावंत यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर हजर होते. सुत्रसंचालन उपशिक्षक राकेश पाटील यांनी तर आभार व्ही .टी . बिर्हाडे यांनी केले .
शेंदुर्णीतील ढोल ताशांच्या गजरात शाळा प्रवेश
शेंदुर्णी। येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी शाळेचा प्रवेश सोहळा गुरुवारी पार पडला. ढोल ताशांच्या गजरात शेंदुर्णी शहरातुन मिरवणुक काढण्यात आली. मुख्याध्यापक प्रमोद खलचे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गुजर व शिक्षक वृंदाकडून शाळेत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले होते. याप्रसंगी पुस्तके वितरण करण्यात आले. आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आज शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोजिनी गरुड, पंचायत समितीचे सदस्य डॉ किरण सूर्यवंशी, सागरमल जैन, मुख्याध्यापक बी.जी.माडवडे यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच वृक्ष, पुस्तके वाटप करून स्वागत करण्यात आले. तर सरस्वती विद्यामंदिर शाळेत उपसरपंच नारायण गुजर व मुख्याध्यापक राजेंद्र पाटील आणि शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत शाळा प्रवेश सोहळा पार पडला.
राष्ट्रीय विद्यालयात प्रवेशोत्सव
चाळीसगाव। येथील राष्ट्रीय विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्यध्यापक एन.एम.पाटील, पर्यवेक्षक सी.सी.वाणी यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यपक यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व उर्वरित प्रवेश घेणार्यांसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना यावेळी शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.