शाळा-महाविद्यालयांत वंदे मातरम हवेच!

0

चेन्नई : शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वंदे मातरम गायलाच हवे. सोमवार किंवा शुक्रवारी हे गीत गायले तर ते अधिक उचित ठरेल, आठवड्यातून किमान एकदा तरी हे राष्ट्रीय गीत गायला हवे, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्यास कुणाचा आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही. पण त्याचे कारण वैध असले पाहिजे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

शाळा, महाविद्यालयांसह सरकारी कार्यालये, संस्था, खासगी कंपन्या आणि कारखान्यांमध्येही महिन्यातून किमान एकदा वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायला हवे, असेही मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जन-गण-मन हे राष्ट्रगीत देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी वाजवणे अथवा ते दाखवणे अनिवार्य केले होते. तसेच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणे अनिवार्य केले होते. तसेच सर्व प्रेक्षकांनी राष्ट्रगीत आणि तिरंग्याच्या सन्मानार्थ उभे राहायला हवे, असेही न्यायालयाने सांगितले होते.