शाळा मुल्यांकन कामकाज लवकरच पूर्ण होणार

0

जळगाव । धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील मुल्यांकनानंतर अनुदानासाठी पात्र उच्च माध्यमिक , कमवी शाळांची यादी घोषीत करण्यात यावी ह्याकरीता नाशिक विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याशी विना अनुदानित कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. याबाबत तांबे यांनी तात्काळ शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यांशी दुरध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी मुल्यांकन कामकाज लवकरच पुर्ण केले जाणार असून मुल्यांकन पात्र उच्च माध्यमिक कमवी शाळांचे प्रस्ताव लवकरच मंत्रालयात पाठविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

शिक्षण उपसंचालकांचे लवकरच काम पुर्ण करण्याचे आश्‍वासन
अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करुन विना अनुदानित उच्च माध्यमिक विभागाकरीता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांना आर्थिक तरतुद करायला लावून 17 वर्षाचा विनावेतनाचा प्रवास संपुष्टात आणु. चर्चे दरम्यान प्रा.सुनिल गरुड, प्रा.अनिल परदेशी, प्रा.पराग पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.मुकुंद आढाव, प्रा.विजय ठोसर, शैलेस राणे आदी शिक्षक उपस्थित होते.