शाळा शंभर टक्के प्रगत करण्यावर मंथन

0

भुसावळ। साकेगाव येथे आयोजित शिक्षण परिषदेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत केंद्रातील सर्व शाळा 100 टक्के प्रगत करण्यावर मंथन करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे होते. मंचावर जिल्हा साक्षरता समिती सदस्य गणेश फेगडे, मुख्याध्यापक जे.पी. सपकाळे, अरुण धनपाल, जी.आर. चौधरी, एस.पी. चौधरी, सुरेखा पाटील उपस्थित होते.

शाळासिद्धीबाबत घेतला आढावा
केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत केंद्रातील सर्व शाळा शंभर टक्के प्रगत करा. कोणत्याही दडपणाखाली काम करु नका, केंद्रातील पेपरलेस कामांचा विशेष उल्लेख करत त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम व शाळा सिद्धीबाबत शाळांचा आढावा घेतला.

90 कोटींचा निधी प्राप्त
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत राज्यात 90 कोटीचा निधी लोकसहभागातून प्राप्त झाला आहे. सकारात्मक विचार ठेवून काम करा असे जिल्हा परिषद गोंभी शाळेचे मुख्याध्यापक गणेश वाणी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. सूत्रसंचालन उपशिक्षीका वैशाली पाटील यांनी केले. तर आभार केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे यांनी मानले.