खिर्डी। केंद्र शासनाच्या शाळा सिद्धि कार्यक्रम अंतर्गत ‘अ’ श्रेणी प्राप्त केलेल्या ऐनपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बाह्य निर्धारण राज्य शासनातर्फे आलेले राज्य निर्धारक किरण केदारे व महेश जाधव यांनी नुकतीच केले. शासनाच्या शाळा सिद्धि कार्यक्रमाअंतर्गत 7 क्षेत्रामध्ये शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता विकास, शिक्षकांची कामगिरी शाळेचे व्यवस्थापन व रेकॉर्ड आदी बाबींची व 46 भाग मानके यांचे विस्तृत तपासणी राज्य निर्धारकांनी केली. तसेच विद्यार्थ्यांचे तास घेतले व यावेळी विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या घेतलेल्या सभेत शाळा सिद्धिच्या क्षेत्रातील सर्व बाबींवर किरण केदार व महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच शालेय समितीतर्फे शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. शाळेतील शाळेचे मुख्याध्यापक शेख रईसोद्दीन व उपशिक्षक इरफान खान यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीतर्फे यावेळी सांगण्यात आले.