शाळेची इमारत कोसळली, दोन विद्यार्थी ठार

0

अहमदनगर : निंबोडी, नगर येथील जिल्हा परिषदेची शाळा सोमवारी दुपारी पावसामुळे पडली. शाळा सुटतानाच ही दुर्घटना घडल्याने एकूण 35 मुलांपैकी कोसळलेल्या या इमारतीखाली 20 ते 25 विद्यार्थी अडकले. यापैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होती. अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

इमारत जुनी, पावसामुळे कोसळली
निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने सोमवारी अचानक शाळेची इमारती कोसळली. याखाली सापडून दोन विद्यार्थी मरण पावले तर सुमारे 20 ते 25 विद्यार्थी शाळेत अडकल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

प्रशासनाची धावपळ
या दुर्घटनेत 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ उडाली होती. अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलविण्यासाठी तातडीने रूग्णवाहिका मागविण्यात आली व उपचारासाठी हलविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.