नोएडा: उत्तर प्रदेशातील सलारपुर गावात शिवमंदिराजवळ केएम मेमोरियल पब्लिक स्कूलमध्ये काल भिंत कोसळल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून शाळेचे व्यवस्थापक, प्रिंसिपल यांच्यासहित काही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री या घटनेमुळे खूपच दु:खी झाले असून प्रशासनाला त्यांनी धारेवर धरले आहे.