चिंबळीः कुरूळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कडवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची दुर्दशा झाली आहे. या शाळेच्या वर्गाचे बांधकाम 1990 साली झाले होते. या वर्गांना कौलाची व लोखडांची कुचकामी झाली असुन मुलांना बसण्यासाठी ही इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या दुरूस्तीसाठी व्यवस्थापन समितीच्यावतीने अनेक वेळा पाठपुरावा करून ही दुरूस्तीसाठी कुठलीच पावले उचली गेली नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर या शाळेची दुरूस्तीची मागणी पालकांकडून होते आहे.
येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गाची दुर्दशा झाली आहे. मराठी माध्यमांचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सर्व सोईसुविधांयुक्त असणार्या शाळेची माहिती घेऊनच पालक शाळेची निवड करतात. शाळेच्या दोन वर्गखोल्या कौलारू आहेत, परंतु त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात पाणी थेट वर्ग खोल्यात येते. इमारतीची लाकडे जीर्ण झाली आहेत. तर दोन वर्गखोल्या सिमेंटच्या आहेत. मात्र शाळेच्या भिंतींना बर्याच्य ठिकाणी चिरा पडून तडे गेले आहेत. सिमेंट पत्रे जुने झाल्याने कुचकामी झालेले आहे.