शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

0

मुंबई । मुलींना स्वत:चे संरक्षण करता यावे व अवेळी अन्याय होत असताना त्याचा त्यांना प्रतिकार करता यावा यासाठी बर्वेनगर महानगरपालिका शाळेतील 5 ते 9 वी इयत्ता वर्गातील मुलींना तायक्वांडो या कराटे प्रशिक्षण शिबिरातून स्वसंरक्षणाचे धडे शिकवण्यात आले. तायक्वांडो प्रशिक्षक संदीप येवले यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या वतीने आज दिनांक 28 नोव्हेंबर 2017 रोजी तायक्वांडो या मुलींसाठी शाळेत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका अश्‍विनी हांडे, नगरसेवक किरण लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय पातळीवर खेळणार्‍या पूजा पाडावे यांनी शाळेतील मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात शाळेतील 200 मुलींनी सहभाग घेतला आहे तसेच आठवड्यातून दोन दिवस मुलींना आम्ही मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे प्रशिक्षक संदीप येवले यांनी सांगितले.