शाळेत जातांना बसमध्ये जागा मिळत नसल्याने विद्यार्थीनींनी अडविली बस

0

रावेर । शाळेत जाण्यासाठी भातखेडा ते रावेर 3 किमी करावा लागला पायी प्रवास मुलींची घटती संख्या लक्षात घेता एकीकडे शासन ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ‘ अभियान राबवित आहे. मात्र ही म्हण लपटून ठेवण्याची वेळ भातखेडा येथे आली आहे. येथील विद्यार्थिनींना रावेर येथे शाळेत जाण्यासाठी बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे विद्यार्थीनींनी 2 तास बस अडवून ठेवली. ग्रामस्थांनी देखील याठिकाणी गर्दी केली. मात्र प्रकरण चिघळत असल्याचे समताच पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेऊन बस उटखेड्याच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे गावापासून ते रावेरच्या शाळेपर्यंत सुमारे 3 किमीचा प्रवास 20 ते 25 विद्यार्थिनींना करावा लागला.

उटखेडा-भातखेडा येथील विद्यार्थ्यांचा एकाच बसमध्ये प्रवास
बसमध्ये बसण्यासंदर्भात दांगडो सुरू असतांना परीक्षेला उशीर होतोय यासाठी मुलींनी लगेच पायी प्रवासाला सुरुवात केली आणि चालत रावेरच्या दिशेने आल्या त्यांना याबाबत दरोरोजची समस्या आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रथम पूर्व परीक्षा सुरू असून भातखेडा गावातील सुमारे दीडशे मुले-मुली रावेरला शिक्षण घेतात त्यांना ये-जा करण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. परंतु उटखेडा-भातखेडा दोघे गावांचे विद्यार्थी एकाच बसमध्ये जात असल्याने दाटी होते व मुलींना बसण्यासाठी जागा मिळत नाही. अखेर त्यांनी पायी प्रवास करणेच सोईचे समजून शाळा गाठली व पर्यायी बस किंवा वेळेच्या आधी दोन फेर्‍या करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थीनींसह नागरिकांची गर्दी
रावेरकडून उटखेडा येथे जाणारी बस विद्यार्थिनीं अडवून त्यामध्ये बसण्याची मागणी केली. परंतु बसच्या वाहक-चालक यांनी आधी उटखेडा येथे बस जाईल आणि तेथून परत रावेरच्या दिशेने येईल तेव्हा भातखेडा येथील मुला, मुलींना बसण्यास मिळेल असे सांगितल्यावर विद्यार्थिनीं बस रोखली व गावातील नागरिक सुद्धा जमा होऊन बसमध्ये बसण्याची मागणी केली. सर्व प्रकरण वाढत आहे असे समजल्यावर रावेर पोलिसांना याबाबत सूचना मिळाली. लागलीच फौजदार दीपक ढोमने, पोलीस कॉन्स्टेबल हरीलाल पाटील व त्यांचे सहकारी येऊन रोखलेली बस सोडून तिला उटखेडाच्या दिशेने रवाना केली. विद्यार्थ्यीनींनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसमध्ये जागा मिळत नाही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अनेकवेळा केली आहे. बसच्या फेर्या वाढवल्यास किंवा पर्यायी बस दिल्यास ही समस्या सुटेल गावातून दिड-दोनशे विद्यार्थी रावेरला शिक्षण घेतात.
– हरी हिवरे, सरपंच, भातखेडा