शाळेत पोर्न साईटस् जॅमर बसविण्याच्या विचारात केंद्र

0

नवी दिल्ली : चाईल्ड पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्याच्या दृष्टीने शाळा परिसरात जॅमर लावू शकतो का? यासंबंधी सीबीएसई बोर्डाला विचारणा केली असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली असताना केंद्र सरकारने ही माहिती दिली.

चाईल्ड पोर्नोग्राफीशी लढा देण्यासाठी आम्ही पावले उचलत असून, गेल्या महिन्याभरात अशा जवळपास 3500 हून अधिक वेबसाईट्सवर बंदी घालण्यात आल्याचेही केंद्राने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका करण्यात आली होती. याचिकेत चाईल्ड पोर्नोग्राफीमुळे देशभरात निर्माण होणार्‍या धोक्यांवर अंकुश ठेवण्यासाठी उचित पावले उचलण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाला शाळेत जॅमर बसवू शकतो का यासंबंधी विचारणा केली, तसेच यासंबंधी विचार करण्यासही सांगितले आहे.