जळगाव- शाळेत रंगीत गणवेश घालून आल्याच्या कारणावरून ला़ना़ विद्यालयातील गणिताच्या शिक्षकाने भोजराज जगदीश पवार या नववीच्या विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली़ याप्रकरणी विद्यार्थ्याने जिल्हापेठ पोलिसात शिक्षकाविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
अधीक माहिती अशी की, भोजराज पवार हा शहरातील शेठ ला़ना़ विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे़ शुक्रवारी भोजराज हा नियमित गणवेश न घालता रंगीत गणवेश घालून आला़ भोजराज हा रंगीत गणवेश घालून आल्याचे नववीच्या वर्गाचे गणिताचे शिक्षक लोहार दिसले़ त्यांनी एनसीसीला वापरली जाणारी काठीने भोजराज याच्या पाठीवर मारहाण करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या पाठीवर जखमी देखील झाली़ हा संपूर्ण प्रकार भोजराज याने त्याच्या ओळखीतील बबलू गायकवाड, शुभम तायडे, विनित पाटील, खंडू बारी यांच्यासह इतर मित्रांना दिल्यानंतर मित्रमंडळी शाळेत येऊन गोंधळ घातला यानंतर विद्यार्थ्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली़ यानंतर शिक्षकाविरूध्द तक्रार दाखल केली.