लंडनमधील शोला नावाचे 4 महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू एका शाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे पिल्लू करत आहे. या ठिकाणच्या पॅलिमाऊथ येथील तवीस्टॉक महाविद्यालयात हे कुत्र्याचे पिल्लू अवघ्या 9 दिवसांचे असताना आणण्यात आले होते. जर परीक्षेला बसलेला कोणता विद्यार्थी ताणतणावाखाली असेल, तर त्याचा ताण कमी करून त्याला शांत करण्यामध्ये या कुत्र्याच्या पिल्लाला चांगले जमू लागले आहे. परीक्षेच्या आधी काही विद्यार्थी खूप तणावात होते, ते परीक्षेला बसू शकणार नाही, अशी त्यांची मनस्थिती होती. मात्र या शोलासोबत त्या मुलांची भेट झाली आणि त्यांच्या तोंडावर हास्य आले.