शाळेत स्कूल व्हॅन आणू नका

0

ठाण्यातील हॉली क्रॉस शाळा प्रशासनाचा अजब फतवा

ठाणे । शाळा परिसरात विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन उतरवित असते. मात्र बुधवारी अचानक शाळेत स्कूल व्हॅन येऊन न देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला. तसेच शाळेपासून 300 मीटर दूर आंबे घोसले तलावाजवळ स्कूल बस पार्क करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

राबोडी परिसरात असलेली या हॉली क्रॉस मुलींच्या शाळेसमोर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.