पहूर । काळानुरूप पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत संपुष्टात येत आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन समाजातील प्रत्येक घटकाने पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे असून शाश्वत पाण्याच्या निर्मिती साठी लोकसहभाग व काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे महत्वाचे आहे, असे आवाहन वरिष्ठ विद्याशास्त्रज्ञ बी. डी. जडे यांनी पहूर येथे केले आहे. पहूर पेठ व आमची माती,आमची माणसं शेतकरी बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिनानिमित्त चंदन कुमावत मंगलकार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. उद्घाटन जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यांनी घेतला सहभाग
प्रा.स्वाती पंडीत ,बाबुराव घोंगडे, दिलीप खोडपे यांनी ही पाण्याचे म्हत्व विशद केले. भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष चिंचोले यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन राजधर पांढरे यांनी केले. सरपंच निता पाटील यांनी आभार मानले. यावेळी रामेश्वर पाटील, संजय देशमुख, साहेबराव देशमुख, अँड एस आर पाटील, सलीम शेख गणी, अरविंद देशमुख पुंडलिक भडांगे, रामभाऊ बनकर, शरद बेलपत्रे पितांबर कलाल,दौलत घोलप, सरपंच ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी जि.प.च्या बांधकाम सभापती रंजनी चव्हाण होत्या. व्यासपीठावर जलश्री संस्थेच्या प्रा.स्वाती पंडीत, लोकनियुक्त पेठच्या सरपंच निता पाटील ,कसबेतील सरपंच ज्योती घोंगडे, कविता देशमुख, महैराजबी शेख बिसमिल्ला मिना पाटील, माजी पं स सभापती बाबुराव घोंगडे, शरद पांढरे, क्रूषी मंडळ अधिकारी एस डी कुलकर्णी, लघू पाटबंधारे विभाग जळगाव एच एच चव्हाण, ए.व्ही नाईक, सुमन पाटील, गयास तडवी, दिलीप खोडपे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पिकांची योग्य निवड गरजेची
पाणी आहे तेथे समृद्धी आहे. पाण्याच्या व्यवस्थापणातून शेतकर्यांनी पिकांची निवड करणे गरजेचे आहे. पाण्याचा पुनर्वापर होणे म्हत्वाचे आहे. तरच आपण पाणी समस्येवर मात करता येईल असे जडे रांनी सांगितले.