शासकीय अधिकार्‍यांकडून ठेकेदाराची पाठराखण

0

वरणगाव । भुसावळ तालुक्यातील फुलगाव आदर्श पुरस्काराने गौरव प्राप्त झालेल्या शिवारात महाराष्ट्र शासन योजने अतर्गत जलयुक्त शिवार अतर्गंत फुलगाव शिवारात सुरु असलेले बांधार्‍याचे बांधकाम पुन्हा निकृष्ठ दर्जाचे होत असून शासकीय अधिकार्‍यांकडूनच ठेकेदाराची पाठराखण होत असल्याचे दिसत आहे.

राजकीय पदाधिकार्‍याकडून अधिकार्‍यांवर दबाव
गेल्या माहिन्याभरापासून फुलगाव शिवारात महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार योजने अतर्गत बांधार्‍याचे कामे मजूर करण्यात आली आहे. सुरु असलेली बांधकामे निकृष्ठ दर्जेचे असल्याने वृत्तपत्रामध्ये वृतांकन करण्यात आले होते. त्या वेळेस अधिकार्‍यांच्या आदेशाने बांधार्‍याचे बांधकाम थांबविण्यात आले होते. तेव्हा अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष चौकशी व पंचनामा न करता ठेकेदाराची पाठराखण करून अधिकार्‍यांनी बांधर्‍याचे बांधकाम पूर्ववत सुरु केले आहे. संबंधित ठेकेदार हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने शासकीय अधिकार्‍यांवर दबाव तत्रांचा वापर करीत आहे. बांधार्‍याची पायाभरणी दगड गोटे, माती मिश्रीत रेती, निकृष्ठ दर्जाचे सिमेंट वापरुन पायाभरणी केलेली आहे. या विषयीची माहिती संबंधीत अधिकार्‍यांना माहित असूनसुध्दा ठेकेदार राजरोसपणे मनमानी पध्दतीने राजकीय पदाचा दुरुपयोग करून पुन्हा त्याच बांधकामावर वरील बांधकाम करीत आहे. मात्र होत असलेले बांधकाम निकृष्ठ दर्जेचे माती मिश्रीत वाळूचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

जलयुक्त शिवार योजनेची अधिकार्‍यांनीच लावली वाट
शेतकर्‍यांच्या शेताला पुरक, पोषक व मुबलक पाणी मिळावे या हेतूने शासनाने जलमुक्त शिवार अंतर्गत वरणगाव परिसरात विविध ठिकाणी नदी नाल्यांवर बंधार्‍यांची बांधकामे मंजूर करण्यात आली असून या बांधकामावर नियंत्रण म्हणून शासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आहे. मात्र एकही अधिकारी बांधकामावर फिरकत नसल्याने ठेकेदारांना निकृष्ठ दर्जेचे बांधकाम करणे फावत आहे. यामुळे जलयुक्त शिवार योजनांची अधिकार्‍यांनीच वाट लावल्याची चर्चा आहे. या सदर्भात शेतकरी वर्ग आयुक्ताकडे तक्रार करणार आहे.