वेल्हे । वेल्हे तालुक्यात उत्कृष्ट काम केलेल्या शासकीय अधिकार्यांचा कादवे येथील ग्रामस्थांकडून नुकताच गौरव करण्यात आला असल्याची माहिती माजी सरपंच नंदा ठाकर यांनी दिली. तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे या मुख्य प्रशासकीय ठिकाणच्या अधिकार्यांनी गतिमान काम केले आहे, असे ठाकर यांनी सांगितले. पंचायत समितीमधील प्रशासन देखील गतिमान झाले असून येथील कामचुकार व सतत गैरहजर कर्मचार्यांना गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी चांगलेच वटणीवर आणले आहे. तसेच तर तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसला असून पर्यटनासाठी आलेले मद्यधुंद पर्यटकांवर वेल्हे पोलिसांची धडक कारवाई सुरू असल्याने मद्यधुंद पर्यटकांना देखील चपराक बसली आहे. तर अवैध धंदे देखील बंद झाले आहेत. अशा कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गास यावेळी गौरविण्यात आले.