मोखाडा : जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत येणार्या 30 आश्रमशाळांपैकी पाच आश्रमशाळा सद्य परीस्थितीत आयएसओ प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. ही बाव नक्कीच येथिल आश्रमशाळांसाठी गौरवाची ठरणार आहे. नेहमीच टीकेचे लक्ष राहीलेल्या आश्रमशाळांच्या या भुमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या हिरवे, गोंदे, विनवळ, साखरा आणि भोपोली या आश्रमशाळा आता एक सुसज्ज आश्रमशाळा व्हाव्यात यासाठी खुद्द शाळाच प्रयत्नशील असुन प्रतिष्ठत समजल्या जाणार्याम आएसओ नामांकनासाठी या पाच आश्रमशाळानी नोंदणी केली असल्याने या कृतीचे अभिनंदन होत आहे. आयएसओ प्रमाणपत्रांसाठी तब्बल 44 निकष असुन यामध्ये शाळा सजावटी पासुन शिक्षण व्यवस्था याचाही समावेश आहे. या निकषांची पुर्तता झाल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र तुर्तास या नामांकनासाठीचा आश्रमशाळांचा प्रवास मात्र अभिनंदनास पात्र ठरत आहे.