शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचे षडयंत्र

0

शहादा । शहाणा ता. शहादा येथे शासकीय आश्रम शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र आदिवासी विकास प्रकल्प विभागातील अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करुन इमारतीचे बांधकाम त्वरीत सुरु करावे अशी मागणी सरपंच रविंद्र पाडवी यांनी केली आहे

आदिवासींचे शैक्षणिक भवितव्य अंधारात
ही आश्रमशाळा बंद करण्याचे षडयंत्र सुरु आहे. शहणा हे तीन हजार लोकवस्तीचे गाव असुन परिसरातील आदिवासी गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आश्रम शाळा बंद झाल्यास आदिवासी मुल व मुलींचे शैक्षणिक नुकसान होइल त्यांना शिक्षणापासुन वंचित केले जाईल आदिवासी बिकास प्रकल्प नंदुरबार यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी सरपंच रविंद्र पाडवी , उपसरपंच वांगीबाइ सुळे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख सखाराम मोते यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार यांना निवेदन पाठवुन केली आहे तर सखाराम मोते यांनी आश्रम शाळा बंद झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी संख्येवर परिणाम
निवेदनात त्यांनी शासकीय आश्रम शाळा भाड्याचा जागेवर चालवली जात आहे. भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी संख्येवर परिणाम होत आहे. सन 2015 पासुन इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध केली आहे. बांधकामाचे अंदाज पत्रक सादर केले गेले आहे. बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तरी अदयाप पावेतो इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आके नाही. एकुण शासनाच्या नियमानुसार 22 अटी पुर्ण केल्याचे देखील निवेदनात
म्हटले आहे.