शासकीय औ. प्रशिक्षण संस्था भडगावला मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

भडगाव – (प्रतिनिधी)येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव येथे कौशल्य विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे आयोजित 16 वर्षा वरील सर्व स्त्री व पुरुष यांचे करिता पंतप्रधान कौशल्य रन स्पर्धेचे दिनांक 17/9/2023 रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आले होते सदर स्पर्धा हि आझाद चौक ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या दरम्यान घेण्यात आली स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 100 युवकयुवतीनी सहभाग नोंदविला

या स्पर्धेच्या उदघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पोलीस उप निरीक्षक श्री डोमाळे साहेब उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य उमाकांत ठाकूर होते या रन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम -सोमनाथ प्रकाश महाजन, द्वितीय -तुषार सुरेश झटके, तृतीय -देवेंद्र अनिल वाघ तर मुलींमध्ये प्रथम – अश्विनी सुनील मोरे, द्वितीय – विद्या राजेंद्र महाले, तृतीय -ज्योती दत्तू पाटील हे विजयी झाले त्यांना प्रथम 3000 द्वितीय 2000 तर तृतीय 1000 व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

स्पर्धा आयोजन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य उमाकांत ठाकूर,गट निर्देशक एस. टी. भडके,पी. बी. पाटील, के. एन. कदम,श्रीमती पी. पी.पगारे, गीता गुप्ता, ऋतुजा पाटील, डी. यू.चव्हाण, डी. डी. अहिरे, ए. बी. वनवे, प्रितेश चव्हाण, मेस्को सुरक्षा रक्षक प्रताप देशमुख, गौतम बाविस्कर, राजेंद्र पाटील, महेंद्र निकम यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीते साठी प्रा. दिनेश तांदळे, प्रा.सुरेश कोळी, स्वप्नील चव्हाण यांनी अनमोल सहकार्य केले यावेळी सर्व युनिटचे विद्यार्थी उपस्थित होते