मुंबई: कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठीच शाळा, महाविद्यालये, मॉल्ससह बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. दरम्यान आता आवश्यक सेवा वगळता सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. यात शासकीय कार्यालयात होणारी गर्दी पाहता शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो.
मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीही बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाची चाचणी खाजगी लॅबमध्येही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. आता खाजगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी करण्यास परवानगी मिळू शकते.