शिंदखेडा। येथील शासकीय धान्य गोडाऊन मधून 100 किलो वजनाच्या दोन गहूच्या गोण्यांची परस्पर विल्हेवाट लावतांना मापाडी आढळून आल्याने त्याविरोधात शिंदखेडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय धान्य गोडाऊनमधील गोडाऊन मापाडी भटेसिंग लालसिंग गिरासे हा 50-50 किलोच्या दोन प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये गहू घेऊन शिंदखेडा बस स्टँडवरून बाहेरगावी घेऊन जातांना शिंदखेडा येथील विजयसिंग नथेसिंग राजपूत यांनी पाहिले. याबाबत विजयसिंग यांनी भटेसिंगला विचारणा याबाबत विचारणा केली असता त्याने तळोदा येथील भाच्याकडे पाठवित असल्याचे सांगितले. तसेच या घटनेबाबत पोलीसांना कळवू नका असे सांगितले. परंतु, विजयसिंग राजपूत यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून शासकीय गोडाऊन मापाडी भटेसिंग लालसिंग गिरासे व शासकीय गोदाम पाल आर. के. प्रल्हाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे