शासकीय गोदामाची नासधूस करून लाखोंचे नुकसान

0

साक्री। साक्री तहसील कार्यालयाचे शेवाळी फाटयावर असलेल्या शासकीय गोदामाचे शटर तोडून नुकसान केले असुन तहसीलदार यांनी दुर्लक्ष केले आहे. नंदुरबार रस्त्यालगत शेवाळी फाटयाजवळ शासकीय गोदामचे बांधकाम केले त्या ठिकाणी रखवालदारसाठी निवास व्यवस्था केली आहे. त्यांचे दरवाजे काढुन घेऊन गेली आहेत तर खिडकीच्या काचा फोडून टाकली आहेत.

शासनाच्या लाखो रूपये खर्च करून केलेल्या कामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय गोदाम ग्राम पंचायत ते विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठीच उपयोगात घेतला जातो. यानंतर या गोदामाकडे कोणी ही लक्ष देत नसल्याने शटर तोडून टाकली आहेत. तर मागील बाजुचे शटर उचकून दिली आहेत. यामुळे अंबट शौकीन या परिसर सह गोदामाचा उपयोग करत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराला आळा घालून तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.