शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे उघड : पिंप्राळा ग्रामपंचायत सदस्य अपात्र

 

 

Encroachment: Pimprala Gram Panchayat members finally disqualified मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंप्राळा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याने त्यांना जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवल्याने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अखेर सदस्यत्व केले सदस्य
गेल्या दीड वर्षांपूर्वी पिंप्राळा गावाची ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यात ग्रामपंचायत सरपंचासह चार सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार विष्णू रघुनाथ झाल्टे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकड केली होती. याबाबत सुनावणी झाल्यानंतर त्यात ग्रामपंचायत सदस्य राजू देवचंद झाल्टे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करीत बांधकाम करून वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. सरपंचांसह उज्वला रामचंद्र झाल्टे, गोपाल श्रीराम झाल्टे, विशाल शंकर झाल्टे, प्रतिभा सचिन झाल्टे यांची चौकशी करून कारवाई करवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.