शासकीय तांत्रिक विद्यालयात योग दिन साजरा !

0

जळगाव: शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज शुक्रवारी 21 रोजी जागतिक योगा दिन संपन्न झाला. यावेळी कविता चौधरी, रोहिणी जंगले यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले. हार्ट पुलनेस चेन्नई संस्थेचे साधक दत्ता जोशी यांनी हार्ट पुलनेस विषयी माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी ध्यान धारणा केली. कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी डी.आर.तायडे, प्रभारी मुख्याध्यापक नवनीत व्ही.चव्हाण, निलेश बढे, महेश सोनवणे, डी.आर.भारंबे, एस.ए.गायकवाड, एच.पी.चौधरी, पी.एन.महाजन, एम.ए.मराठे, के.आर.पाटील, एस.के.राव, ए.एस.चौधरी, एस.डी.मेहेर, एस.बी.विसपुते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.ए.बोंडे यांनी केले.