शासकीय तांत्रिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण

0

जळगाव- शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात 6 रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेली 50 वृक्ष जगविण्यात आली. यंदाही 25 वृक्ष लागवड करुन जगविण्याचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी नाशिक शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक एस.आर. सुर्यवंशी, जैन इरिगेशन उद्योग समूहाचे जनरल मॅनेजर चंद्रकांत नाई, जैन एरीगेशनचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख आर.एस.आगीवाल, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डी.आर.तायडे, मुख्याध्यापक एन.व्ही. चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी.एल.बोंडे यांनी केले.