शासकीय नमुन्यात जात प्रमाणपत्र वितरीत करा

0

भुसावळात ठाकूर जमात मंडळातर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ- प्रांताधिकारी कार्यालयातून ठाकूर जमातीला जातीचा दाखला देतांना अन्याय होत आहे. दाखले देतांना संपूर्ण कॉलम सहित सी-फार्मेटमध्ये बदल करावा, या मागणीसाठी गुरूवारी आदिम अनुसूचीत ठाकूर जमात मंडळातर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. प्रांताधिकारी कार्यालयातून दिला जाणारा जातीचा दाखला जातपडताळणी समिती ग्राह्य धरत नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यातच दाखला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनुसूचित ठाकूर जमातीवर अन्याय
भुसावळ तालुक्यातील अनुसूचित ठाकूर जमातीस प्रांताधिकारी कार्यालयाकडून अन्याय होत आहे. शासन निर्णयाप्रमाणे 1950 पुर्वीच्या जातीचा नोंद असलेला कोणताही शालेय किंवा महसूल पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. प्रांताधिकारी कार्यालयातून चुकीच्या नमुन्यात जातीचे दाखले दिले जात आहे. त्यामुळे जात पडताळणी समिती हा दाखला ग्राह्य धरत नाही. त्यामुळे सरकारी नमुन्यातच दिले जावे, अशी मागणी ठाकूर समाजबांधवांनी केली.

यांचा शिष्टमंडळात समावेश
समाजाचे अध्यक्ष ए.पी.ठाकूर, सहसचिव वासुदेव ठाकूर, अष्टभूजा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष जी.आर.(मामा) ठाकूर, दिनेश ठाकूर, अविनाश ठाकूर, एकनाथ ठाकूर, अशोक ठाकूर, रवींद्र ठाकूर, राजकुमार ठाकूर, अभिलाष ठाकूर, जगदीश ठाकूर, दिलीप ठाकूर, नामेदव ठाकूर, स्वप्नील ठाकूर, रमेश ठाकूर, पंकज ठाकूर, अनिल ठाकूर, किरण ठाकूर, विजय ठाकूर, नगरसेवक दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.