शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

0

सणसवाडी । शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांचा विकास होत असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले. सणसवाडीकरांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामविकास निधीतून साडेअकरा लाख रुपये खर्चून गणेशनगरमधील भुजबळ वस्ती येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पाचर्णे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रकल्पासाठी दिनकर नाथोबा भुजबळ यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भुजबळ यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पाचर्णे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार पाचर्णे यांनी सदर प्रकल्पाची पाहणी करून ग्रामपंचायतीचे कौतुक केले. सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, आनंदराव हरगुडे, बाबासाहेब दरेकर, गणेश दरेकर, अश्‍विनी दरेकर, बी. एच. पवणे, विद्याधर दरेकर, गोरख भुजबख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.