शासकीय योजनांपासून लाभार्थी वंचित

0

जव्हार (संदीप साळवे)- जव्हार तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील महसूल गावांच्या इंदिरा आवास घरकुल योजनेच्या शासनाच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे आदिवासी लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे गरिब दारिद्—य रेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांना फटका बसला आहे. तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायतीतील मेढा व रामनगर ही दोन महसूल गावे, तसेच पाडे लहान मेढा, मोठा मेढा, कातकरीपाडा, तांबटीपाडा, कोलणीपाडा, या पाड्यांना सन- 2011 प्रतीक्षा च्या यादीनुसार दारिद्र्य रेषेखालील घरकुल योजनेचे सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे या गावं पाड्यातील एकही आदिवासी लाभार्थी इंदिरा आवास घरकुल योजनेत बसला नाही. सन-2011 च्या प्रतीक्षा यादीनुसार इंदिरा आवास घरकुल योजनेत एकाही गरिब दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे नाही. त्यामुळे या गावं पाड्यातील एकाही आदिवासी लाभार्थ्याला इंदिरा आवास घरकुल योजना लाभ देण्यात आलेली नाही.

103 कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील, मात्र लाभ नाही
कोरतड पैकी महसूल गावे मेढा व रामनगर आणि महसूल गावांचे पाच पाडे आहेत. त्यामुळे हे दोन्ही महसूल गावे मिळून 443 कुटुंबे आहेत. यापैकी 103 कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील असून त्यांचे साधे कुडाचे घरे आहेत. तसेच कातकरी पाड्यातील शंभर टक्के आदिवासी कुटुंबे ही आदिम जातीतील असल्याने दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यामुळे त्यांना इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणे गरजेचे होते. मात्र त्या वेळच्या शासनाच्या अधिकार्‍यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे गोरगरीब आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेच्या लाभापासून मुकावे लागत आहे.

लाभ मिळवण्यासाठी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन
कोरतड मधील मेढा व रामनगर या महसूल गावांतील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, म्हणून गटविकास अधिकारी यांना निवेदने देवून यांचा काहीच पुरावा मिळत नाही. तसेच ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या लाभार्थ्यांनी ड फार्म भरून पंचायत समितीकडे जमा करावा. त्यामुळे येथील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी ड फार्म जव्हार पंचायत समितीकडे जमा करण्यात आले आहेत.

आम्ही या घरकुल योजनेचा लाभ प्रतीक्षा यादीत नावे असतील त्यांनाच आम्ही इंदिरा आवास हरकुल योजनेचा लाभ देतो. या सर्वेक्षणाबाबत मी काही बोलू शकत नाही.
प्रशांत सोनेरी ग्रामसेवक कोरतड.

कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील शंभराहून अधिक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यावेळच्या सन 2011 च्या इंदिरा आवास घरकुल योजनेचा सर्वे चुकीचा झाला आहे. त्यामुळे आम्हच्या गरीब कुटुंबांना योजनेपासून मुकावे लागले आहे. याचा आम्ही पाठपुरावा करूनही घरकुल योजना मिळत नाही. त्यामुळे यानंतर उपोषणास बसणार आहोत.
परशुराम खुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य- कोरतड.