जळगाव। शासन तळागाळातील जनतेसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवित आहे. शासन ग्रामीण जनतेला केंद्र बिंदु मानुन त्यांच्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहे. शासकीय योजना ह्या जनतेसाठी असतात त्यांचा योग्य प्रचार प्रसार झाला पाहिजे, जेणे करुन प्रत्येकांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. तळागाळातील जनतेपर्यत शासनाच्या योजना पोहोचवा अशी सुचना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. जळगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा त्यांनी शुक्रवारी 12 रोजी आढावा घेतला. विभागानिहाय राबविल्या जाणार्या योजनांची त्यांनी माहिती जाणुन घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तहसिलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी शकुंतला सोनवणे उपस्थित होते.
आसोदा पाणीपुरवठा योजनेत घोटाळा
जळगाव तालुक्यातील भारत पेयजल योजनेंतर्गत राबविल्या जाणार्या पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आली. मात्र योजना अपुर्ण अवस्थेत असुन योजनेच्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप खेमचंद्र महाजन, ईश्वर चौधरी यांनी केले आहे. संबंधीत ठेकेदारांनी रक्कम लाटली असून कामाची श्वेतपत्रिका काढून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
निधींची माहिती लवकर द्या
जळगाव तालुक्यातील ग्रामपंचातीला 14 व्या वित्त आयोगामार्फत मिळणार्या निधींची माहिती 8 दिवसात देण्याचे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले. सेवा हमी कायद्या अंतर्गत शिबीर राबवुन नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देणे, स्मशानभुमि नसलेल्या गावांची माहिती तात्काळ पाठवणे, आयएसओ शाळा वाढवुन डिजीटल शाळा करण्यावर भर देण्याची सुचना त्यांनी दिल्या.
उद्धट वागणार्यांची बदली करा
कामासाठी शासकीय अधिकारी कर्मचार्यांच्या कार्यालयात खेटे घालणार्या शेतकर्यांना जर उद्धटपणे वागणुक दिली जात असेल तर अशी वागणुक देणार्यांची जिल्ह्याबाहेर दुर बदली करण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले. शेतकर्यांच्या जोरावर तुम्ही सगळे पगार घेतात. त्यामुळे शेतकर्यांच्या विकासासाठी काम करा असे त्यांनी सांगितले.
दानवेच्या डोक्यात सत्त्ेची हवा
तुर खरेदी संदर्भात शेतकर्यांना अपशब्द बोलणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली आहे. दानवेंना ‘साले म्हणण्याची हौस असून शेतकरी जर दानवेंचे पाहुणे झाले तर काही खैर नाही’ या शब्दात गुलाबराव पाटील यांनी रावसाहेब दानवे यांचा समाचार घेतला.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा
शासन जनतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्तिचा जर अपघातात मृत्यु झाला तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विम्या योजनेंतर्गत 2 लाखाची मदत देण्यात येते. जळगाव तालुक्यतील किती अपघात ग्रस्ताच्या कुटुंबीयांना मदत मिळाल्याची माहिती मंत्र्यांनी त्यांनी मागीतली असता. अत्यंत कमी लाभार्थींना या योजनेचा लाभ दिल्याचे दिसून आले. ग्रामसेवक तलाठी यांच्याकडे शेतकर्यांचे येणे जाणे असते त्यामुळे त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करण्याची सुचना यावेळी देण्यात आली.